mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ठरलं तर मग! सोलापुरातून गोव्यासाठी ‘या’ तारखेपासून विमानसेवा; मुंबईची मागणी रेंगाळली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 11, 2025
in मनोरंजन, सोलापूर
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सोलापूरकरांच्या दृष्टीने आत्मीयतेची असलेला सोलापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळला असताना, सोलापूरकरांसाठी गोवा विमानसेवा येत्या २६ मेपासून सुरू होणार आहे.

ही विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘फ्लाय ९१’ ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी सज्ज झाली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

मात्र या विमानसेवेसाठी उपलब्ध होणारे विमान किती आसन क्षमतेचे राहणार आणि आठवड्यातून किती दिवस ती सुरू असणार, याचा तपशील उपलब्ध झाला नाही.

सोलापूरकरांना मुंबई प्रवासी विमानसेवेची वर्षानुवर्षांपासून प्रतीक्षा आहे. यापूर्वी २००८ साली सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने किंगफिशर कंपनीने मुंबई- सोलापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू केली होती.

परंतु तांत्रिक कारण पुढे करीत ती बंद केली.दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सत्तेत असताना त्यांनी शहरानजीक बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ उभारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून मंजुरी मिळविली होती.

त्यानुसार सुमारे दोन हजार एकर जमिनीचे संपादनही झाले होते. परंतु गेल्या अकरा वर्षांत या विमानतळ उभारणीचा प्रश्न वन खात्याची अडचण असल्याचे कारण पुढे करून प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

दुसरीकडे होटगी रस्त्यावरील जुन्या विमानतळालगत विमानसेवेसाठी अडथळा ठरलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची उंच चिमणी पाडून येत्या जून महिन्यात दोन वर्षे उलटत आहेत.

मात्र तरीही या ना त्या कारणाने विमानसेवेला मुहूर्त लागत नाही. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे लोकार्पण केले होते. त्यानंतर विमानसेवेसाठी सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

परंतु सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी व मंत्र्यांनी आश्वासनापलीकडे काहीही दिले नाही. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे सोलापूरच्या तुलनेने पिछाडीवर असलेल्या अमरावतीसारख्या शहरासाठी मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. इकडे सोलापूर विमानसेवेचा पत्ता नसताना गोवा विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने घेतला आहे.

मुंबई विमानसेवेसाठी यापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असता, ‘स्टार एअर’ कंपनीने ही जबाबदारी घेतली होती. परंतु पुन्हा तांत्रिक अडचणीमुळे मुंबई विमानसेवेचा प्रश्न तूर्तास मागे पडला आहे. मुंबई आणि हैदराबादसाठी सोलापूरहून विमानसेवा सुरू करण्याची मागणी आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर विमानसेवा

संबंधित बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सुट्ट्या

March 17, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

ब्रेकिंग! सोलापूर झेडपी अध्यक्षपदाचा पेच सुटणार? पालकमंत्र्यांकडे सर्वांच्या नजरा; ‘ही’ नावे आहेत सर्वात पुढे

March 16, 2026
Next Post
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! सोलापूरमध्ये पाकिस्तान नागरिकांचे वास्तव्य; 'इतक्या' जणांना परत पाठवण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय; पालकमंत्री गोरे

ताज्या बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..