टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापुर जिल्हातील सर्व नगरपालिकेला पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचा निधी देण्यात आला आहे. मात्र मंगळवेढातील नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आम्हाला निधी केंद्र सरकारने दिला नाही असे सांगून केंद्र सरकारची बदनामी करत आहेत.
मंगळवेढातील घरकुल धारकांचा तिसरा हप्ता जमा झाला असुन घरकुल धारकांची रक्कम नगरपालिकेने बिले काढून रक्कम खर्च केला आहे.
मात्र घरकुल धारकांना सांगितले जाते की अजून तिसरा हप्ता जमा नाही झाला आहे असे सांगितले जाते तरी सदर घटनेची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आदित्य मुदगुल-हिंदुस्तानी यांनी केली आहे.
मंगळवेढा शहरातील पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलांचा उर्वरीत ५० हजार रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही ही घरकुले सन २०१८-१९ मध्ये ही मंजूर झालेली आहेत.
घरकुल धारक हे पायाभरणी पासून भाडोत्री घरामध्ये राहत आहेत. सदर घरकूल पूर्ण करण्यासाठी इतर लोकांकडून हात ऊसने, काही लोकांनी बँका, पतसंस्थेतून कर्ज काढून घरकुलाचे बांधकाम नियमाप्रमाणे पूर्ण केलेले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घरकुलाचे अनुदान वेळेवर न मिळाल्याने ते अनुदान बँकांचे व पतसंस्थेचे, सावकारांकडून घेतलेले हातउसने पैशांच्या व्याजातच गेले.
तसेच भाडोत्री घराचे भाडे भरून सर्व घरकूल धारक हे मेटाकुटीला आलेले आहेत तरी सर्व घरकुल धारकांचा गेली तीन चार वर्षाचा घर भाडे संबंधित अधिकार्या कडून वसुल करण्यात यावा.
तरी मंगळवेढा नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या घरकूल धारकांची दयनीय अवस्था झालेली आहे. तरी आता नगरपालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर घरकुल धारकांना उर्वरीत हप्ता ५० हजार रुपयांचा निधी मिळणार का? की निष्क्रिय मुख्यधिकारी यांची बदली झाल्यावर घरकुल धारकांना न्याय मिळणार असा प्रश्न घरकुल धारकांना पडलेला आहे.
घरकूल धारकांना न्याय देण्यासाठी नगरपालिकेने त्वरीत घरकुल धारकांच्या खात्यावर उर्वरीत ५० हजार रुपयांचा निधी येत्या आठ दिवसात वर्ग करावा अन्यथा मंगळवेढा नगरपालिका कार्यालय ते प्रांतकार्यालय लोटांगन आंदोलन करून नगरपालिकेचा निषेध करण्यात येईल असा इशारा या सामाजिक कार्यकर्ते आदित्य मुदगुल – हिंदुस्तानी यांनी नगरपालिका प्रशासन अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज