सोलापूर शहरात कौटुंबिक वादातून मुलीने दुसऱ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही माहिती कळताच मुलीच्या वडिलांनी बेडरुममध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
या दोन्ही घटना पोलिसांच्या समक्ष घडल्या. यामुळे मुलगी व वडिलांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ याबाबत हवालदार भाऊसाहेब कृष्णात दळवे (नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हवालदार भाऊसाहेब दळवे ड्युटीवर असताना गुरुवारी रात्री त्यांना गेंट्याल टॉकिजजवळ रुक्मिणी कॉम्प्लेक्स येथील दुसऱ्या मजल्यावर घरगुती भांडण सुरू असल्याची माहिती कळाली. Rukmini Complex near Gential Talkies
त्या माहितीवरून दळवे हे तेथे पोहोचले तेव्हा तेथे कविता विटकर व आरती विटकर या दोघांमध्ये भांडण सुरू होते. त्यावेळी विठ्ठल विटकर हे तेथेच उपस्थित होते.त्यावेळी त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते.यामुळे दळवे यांनी विठ्ठल यांना दवाखान्यात उपचारासाठी जाण्यास समजावून सांगत असताना आरोपी आरती विठ्ठल विटकर (वय २३, रा.रुक्मिणी कॉम्प्लेक्स, गेंट्याल टॉकिज) हिने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
त्यात आरती हिला डोक्यास व उजव्या पायास गंभीर जखम झाली. यामुळे तिला उपचारासाठी दळवे व आरतीच्या भावाने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवले. दरम्यान, वडील विठ्ठल चन्नाप्पा विटकर (वय ५३, रा. रुक्मिणी कॉम्प्लेक्स) यांनी घरात बेडरुमचे आतून दार लावून घेऊन गळफास घेण्याचा प्रयत्न करत होते.
पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी दरवाजा तोडून बेडरुममध्ये प्रवेश केला आणि विठ्ठल यांच्या गळ्याची फास काढत त्यांना हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत दाखल केले.
यामुळे आरोपी विठ्ठल विटकर व आरोपी आरती विठ्ठल विटकर यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे़. घटनेचा तपास पोलीस सहायक इन्स्पेक्टर शेख हे करत आहेत.
Solapur The girl jumped from the second floor due to a family dispute; The father took the snare
बंगला विकणे आहे.
३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज