टीम मंगळवेढा टाईम्स ।
लहान मुलांना नखे खाण्याची सवय असते. काही ठिकाणी तर अनेकदा मोठे व्यक्तीही नखे खाताना दिसतात. मात्र, जयपूर येथील अलवर शहरातील एका मुलीला केस खाण्याची सवय होती.
तिच्या पोटात दुखत असल्याने शस्त्रक्रिया केल्यानंतर पोटात चक्क एक फूट लांब आणि 10 सेमी जाडीचा केसांचा गुच्छा निघालाय. या घटनेने डाॅक्टरही हैराण झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अलवर शहरातील एका मुलीला लहानपणापासून तोंडात केस घालायची सवय होती. ती आता 15 वर्षाची आहे.
सतत केस खाल्याने तिच्या पोटात केसांचा गुच्छा तयार झाला होता. जवळपास 90 टक्के भाग त्या केसांच्या गुच्छाने व्यापला होता. त्यामुळे पोटात केवळ खाण्यासाठी 10 टक्केच भाग शिल्लक राहिला होता.
तिला जास्त जेवणही जात नसे. पोटदुखी, उलटी येणे अशा अनेक पोटांच्या समस्या निर्माण झाल्या. तिला जेव्हा रूग्णालायत दाखल करण्यात आले तेंव्हा सोनोग्राफीत पोटात काहीतरी अनावश्यक असल्याचे दिसले.
डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया केली असता. पोटात केसाचा गुच्छा आढळला. या घटनेमुळे डाॅक्टरही हैराण झाले आहेत.
मुलीवर शस्त्रक्रिया केलेले डाॅ. उपाध्याय यांनी सांगितले की, मुलीने लहानपणापासून नकळतपणे केस, नखे, बाजारातील मिलावटी गोष्टी खाल्या असतील. त्या एकत्र आल्या आणि पचण न झाल्याने त्यांचा एक गुच्छा तयार झाला.
त्या गुच्छ्याने तिच्या पोटाली 90 टक्के भाग व्यापला होता. आता शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती ठीक असल्याचेही डाॅक्टर उपाध्याय यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज