टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यातील हिंन्दू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शहरातील हजरत गैबीपीर उरुसानिमित्त आजपासून दि.3 ते 6 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गैबीपीर देवस्थान कमिटीचे सरपंच प्रशांत गायकवाड यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे या ऊरूसाला खंड पडला. परंतु साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्यामुळे विविध सण व यात्रेस सुरूवात होऊ लागली.
या ऊरूसामधील हिंदू मुस्लीम ऐक्य देशात आदर्श निर्माण करणारे ठरतेया निमित्ताने आज 3 मार्चला यात्रेच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन ज.अमीरहमजा (हमजुचाचा )साहेबहुशेन खतीब यांच्या शुभहस्ते व बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने होणार आहे.
सायंकाळी कळसाची भव्य मिरवणूक व देवाचा गंध या कार्यक्रमाचे उद्घाटन जि.म. बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्या शुभ हस्ते व देवस्थान कमिटीचे सरपंच प्रशांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर,
तहसीलदार स्वप्निल रावडे,उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पो. नि. रणजित माने , मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण,तलाठी संघटनेचे उमेश सूर्यवंशी ,मानकरी प्रमुख अनिल पाटील आदीच्या उपस्थितीत होणार आहे.
शुक्रवारी “शोभेचे दारूकामाचे उद्घाटन विष्णूपंत अवताडे यांच्या शुभहस्ते तर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
शनिवारी सायं. 7 वाजता “जंगी कव्वाली “या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते व शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली तर.
रात्री खाटीक व बेदरे समाजाच्या वतीने “भंडारखाना नैवेद्य “दाखविण्याचे नियोजन केले.शनिवारी 4 वाजता “जंगी कुस्त्या मैदानाचे भगीरथ भालके यांच्या हस्ते व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सायं. 7 वाजता “साज सातारा” हा वीरेंद्र केंजळे प्रस्तुत मराठी व हिंदी गझल व गीतांची सुरेल मैफल कार्यक्रमाचे उद्घाटन डाॅ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या हस्ते व उपप्राचार्य तेजस्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
रविवारी “काव्य मैफिल “आमंत्रित कवींचे काव्य संमेलनाचे उद्घाटन मा.आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते व रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
हजरत गैबीपीर उरुसानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच प्रशांत गायकवाड व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज