मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
शेतकऱ्यांना उद्योजक होण्यासाठी सरकार १० लाखांपर्यंत अनुदान देत आहे. अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सरकार मदत करत आहे, यासाठी १५ ऑगस्टपर्यंत कृषी जागृती पंधरवडा आयोजित केला आहे.
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून नवीन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारीकरण व अद्ययावतीकरणासाठी अर्थसाहाय्य केले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
१ ते १५ ऑगस्टच्या दरम्यान प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यशाळा आयोजित करून प्रचार व प्रसिद्धी करून लाभार्थ्यांचे अर्ज मागणी केली जात आहे. योजनेसाठी वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित पीठ, पापड, बिस्किटे, माल्ट, फ्लेक्स, कुकीज, आईसक्रीम, चिप्स, बासुंदी,
दूध पावडर, खवा, बेदाणा प्रक्रिया, नमकीन, फुटाणे, पोहा, पल्प, जाम, जेली, गूळ पावडर इत्यादी पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ टक्क्यांपर्यंत व जास्तीतजास्त १० लाख रुपये अनुदान देण्यात येईल. यासाठी पात्र उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज