मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील हॉटेल गारवा शेजारी असणाऱ्या पाण्याच्या बोअरवेलमध्ये पिशवीत घालून दोरीने आत सोडलेला गांजा पोलिसांनी जप्त करून
हॉटेल चालक आशीफ अबूबकर तांबोळी व स्वयंपाकी सिद्धेश्वर सुखदेव बनसोडे यांना मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवेढ्यातील आरोपींना न्यायाधीश आर.एम. देवर्षी यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई दि. २७ जुलै २०२३ रोजी करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी, २७ जुलै रोजी लक्ष्मीदहिवडी येथे गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षिका नयोमी साटम यांना मिळाल्यानंतर सपोनि धापटे, सपोफी पाटील, सपोफौ हिप्परकर, पोना विभूते, पोना पांढरे, पोकॉ पोरे, पोकॉ देशमुख पोका आवटे, तोलार,
दोन पंच व फोटोग्राफर यांचेसह दि. २७ जुलै २०२३ रोजी नयोमी साटम यांच्या पथकाने लक्ष्मीदहिवडी येथील हॉटेल गारवा येथे जाऊन झडती घेतली असता हॉटेलला लागून असलेल्या बोअरवेलमध्ये संशयास्पदरित्या दोरी दिसून आली.
त्यावेळी पोलिसांनी व पंचांनी बोअरवेलचे कव्हर उघडताच दोरीला बांधून आत सोडलेली पिवळ्या रंगाची कापडी पिशवी पोलिसांना दिसली. त्यावेळी ती पिशवी काढून तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे दिसून आले,
त्याचे वजन एक किलो मिळून आले असून वीस हजार किमतीचा गांजा व आरोपीचा ८० हजाराचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
सदर गुन्ह्यातील आरोपी हॉटेल चालक आशीफ आबूबकर तांबोळी व स्वयंपाकी सिद्धेश्वर सुखदेव बनसोडे (रा. लक्ष्मीदहिवडी, जि. सोलापूर) याचेविरोधात फिर्याद पोहेकॉ हजरत पठाण यांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम धापटे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज