टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गडचिरोलीत कार्यरत असताना आदिवासी भागातील दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल केंद्र सरकारने घेतली असून त्यांच्या कामाला राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
आज ३ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांग सशक्तीकरण विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्यांग बांधवांना आदिवासी पाड्यापर्यंत घरपोच दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करणारा गडचिरोली हा महाराष्टातीलच नव्हे तर देशातील पहिला आदिवासी जिल्हा ठरला आहे.
यासाठी गडचिरोलीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कार्याची दखल घेत या राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
दोन टप्प्यात अठरा शिबिर
मिशन इन्स्टिस्ट्यूट फॉर ट्रेनिंग, रिसर्च अँड अॅक्शन (मित्र) संस्थेद्वारा संचालित गडचिरोली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक अभिजित राऊत यांच्या सहयोगाने २० फेब्रुवारी ते १६ मार्च, २०२३ या कालावधीत दोन टप्प्यांत दिव्यांग प्रमाणपत्र वाटप अभियान राबवले.
पहिल्या टप्प्यात मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासह ३० ठिकाणी प्राथमिक तपासणी शिबिरे आणि दुसऱ्या टप्प्यात १८ ठिकाणी शिबिरे आयोजित करून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध करून देण्यात आले. हा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्याला प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी गडचिरोली हे पुरस्कार स्वीकारणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज