मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राज्य सरकारने अलीकडेच महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना राज्यभरासाठी लागू केली. योजनेंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमाकवच देण्यात आले आहे.
योजना राज्यातील बड्या रुग्णालयांतही लागू व्हावी यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील शासकीय आणि खासगी अशा 1340 रुग्णालयांत योजना लागू आहे.
महात्मा ज्योतीराव फुले योजना आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंब व अधिवास प्रमाणपत्रधारक (डोमिसाइल सर्टिफिकेट) कुटुंबांना लागू करण्यात येत आहे. मात्र, शहरी मध्यम वर्गातील बहतांश कटंबे ज्या खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी जातात, तिथे मात्र योजना घेण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, धर्मादाय रुग्णालये जी खासगी रुग्णालये आहेत, त्या ठिकाणीसुद्धा योजना लागू करण्यात आलेली नाही.
योजनेंतर्गत जे दर आजारांवरील उपचारांसाठी निश्चित करण्यात आले आहेत, ते शहरातील रुग्णालयांच्या दृष्टीने कमी असल्याचे प्राथमिक कारण योजनेच्या सुरुवातीपासूनच देण्यात येत आहे.
या योजनेचा काही दिवसांपूर्वीच विस्तार करण्यात आला आहे. त्यात योजनेंतर्गत येणाऱ्या आजारांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच त्यांच्या उपचारांचे दरही वाढविण्यात आले आहेत. राज्यात २००० खासगी रुग्णालयांना योजना लागू करण्याची इच्छा आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील २०० रुग्णालयांना योजनेत सहभागी व्हायचे आहे. याबाबत लवकरात निर्णय घेण्यात येईल. -विनोद बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज