मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक येथे असलेले गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व उपचार सुरू झाल्याची माहिती डॉक्टर प्रवीण सारडा यांनी दिली आहे.
आता सर्व नागरिकांना अचूक निदान व योग्य उपचार, मणक्याच्या व हाडांच्या किचकट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करून उत्तम उपचार, मान,पाठ, कमरेच्या व मणक्याच्या व हाडांच्या सर्वच आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
गजानन लोकसेवा हॉस्पिटल येथे सर्व स्पेशालिस्ट तज्ञ डॉक्टर उपलब्ध असून सर्व रोगांच्या शस्त्रक्रिया व उपचार मोफत केले जाणार आहेत.
गजानन लोकसेवा हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रवीण सारडा यांनी भारतातील व विदेशातील उत्कृष्ट इन्स्टिट्यूट मधून आपली आर्थोपेडिकची ट्रेनिंग घेणारे ते उत्कृष्ट डॉक्टर आहेत.
उपलब्ध विभाग
गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिन, आर्थोपेडिक, डेंटिस्ट्री, न्यूरोलॉजी, न्युरो सर्जरी, गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी, प्लास्टिक सर्जरी, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, जनरल आणि लॅप्रोस्कोपी सर्जरी, नेफरोलॉजी, यूरोलॉजी, ऋमॅटोलॉजी, मेडिकल ओक्नॉलॉजी, सर्जिकल ओक्नॉलॉजी, अँनास्थेसीओलॉजी, रेडिओलॉजी आणि इमेजिंग, स्किन अँड व्हिडी, डायबेटोलॉजी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फिजिओथेरपी, न्युरो फिजिओथेरपी व स्पीच थेरपी आदी विभाग उपलब्ध आहेत.
उपलब्ध सेवा.
ऑपरेशन थिएटर्स, आय सी यु, सुसज्ज कॅज्युल्टी, 24 तास पॅथॉलॉजी व मायक्रोबायोलॉजी, डिजिटल इमेजिंग व रेडिओलॉजी, किडनी डायलिसिस युनिट, डायबेटिक केअर युनिट, पी.एफ.टी, सी आर्म, सेंट्रल ऑक्सिजन,
सेंट्रल सक्शन, सर्व सुविधायुक्त ट्रॉमा ॲम्बुलन्स, 24 तास औषध दुकान, ऑटोमॅटिक जनरेटर बॅकअप, किडनी डायलिसिस युनिट आदी सेवा दिल्या जात आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सामाविष्ट लाभार्थी :–
या योजनेंतर्गत अन्नपूर्णा योजना, दारिद्य रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड आणि दारिद्र्य रेषेवरील केशरी रेशनकार्ड ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे असे कुटुंबे या योजनेस पात्र ठरतील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज