टीम मंगळवेढा टाईम्स ।
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून मंगळवेढा शहरातील सर्व कोव्हिड सेंटरला दररोज संध्याकाळी नॉनव्हेज सूप व आठवड्यातून एकदा मोफत अंडी हॉटेल संगमकडून देण्यात येणार असल्याची माहिती संचालक नवनाथ केदार यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील हॉटेल व्यवसाय मध्ये सुप्रसिद्ध असणारे हॉटेल संगमचे संचालक नवनाथ केदार व केदार परिवार तसेच हॉटेल संगम टीम यांच्याकडून हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
आज मंगळवेढा येथील पंढरपूर रोडवरील वीरशैव मंगल कार्यालयातील कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना ही सेवा देताना ते बोलत होते.
हॉटेल व्यवसाय मध्ये आपण यशस्वी असलो. तरी समाजाचं देणं लागतो. कोरोना कालावधीमध्ये नागरिकांना दिलासा देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे केदार बंधू यांनी हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले.
यावेळी नायब तहसीलदार बाळासाहेब मागाडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद शिंदे, मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे दयानंद हेंबाडे, कर निरीक्षक विनायक साळुंखे,ग्रामविकास अधिकारी सौ.रेखा जाधव, पोलीस नाईक सोमनाथ माने, ग्रामीण रुग्णालयाचे विजय येलदरे, देगावचे सरपंच शरद डोईफोडे, नितीन शेवते,अजित केदार, अरुण केदार, अमोल केदार आदी मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. तसेच उद्योजक, दानशूर व्यक्तींनी अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रम हाती घेऊन कोरोना सारख्या कालावधीमध्ये रुग्णांना आधार देऊन सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे. असेही यांच्याकडून सांगण्यात आले.
सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य सुरू
सोलापूर जिल्ह्यासह तालुक्यातील जनतेने हॉटेल संगम व्यवसाय यशस्वी होण्यासाठी खूप मदत केल्याने तसेच या व्यवसाय मध्ये त्यांचे योगदान असल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी व त्यांचे ऋण आपल्यावरती असल्याकारणाने आपण हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.- नवनाथ केदार
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज