मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये आज रविवार दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
बोराळे नाका येथे मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे नेहमीच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक मोफत शिबिरे आयोजित करीत असतात.
डॉ.मनीष बसंतवाणी (MBBS, DNB, Medicine, Fellowship in Diabetes Mellitus Fellowship Infectious Disease ) कन्सलटिंग फिजिशियन अँड इंटेनसिव्हीस्ट हे तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत.
खालील लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी संपर्क साधावा
डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियां, टीबी यांसारख्या आजारांवर निदान व उपचार, शरिरातील रक्त कमी असणे, वारंवार थकवा येणे, डोके दुखी (Migraine)
अतिथकवा, चिडचिड होणे, चालताना दम लागणे व घाम येणे, हृदयरोग, चक्कर येणे, किडनी विकार, मेंदू विकार, लकवा (Paralysis)
टायफाईड, छातीत दुखणे, धडधडणे, वजन कमी होणे, मधुमेह, उच्च रक्तदाब
भूक न लागणे, थायरॉईड, हातापायांना सुज येणे, झटके, कावीळ, लिव्हर, पित्ताशयाचे आजार, रक्तपेशींचे आजार
आवश्यकता असल्यास खालील तपासण्या शिबिरामध्ये मोफत करण्यात येतील
• ईसीजी • सीबीसी • रँडम ब्लड शुगर • रक्तातील कोलेस्ट्रॉल • ब्लड प्रेशर •
एक्सरे
दरम्यान, कोलेस्ट्रॉल तपासणीसाठी रुग्णांनी उपाशी पोटी यावे असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज