टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील शासनमान्य मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व मंगळवेढा नगरपरिषद यांचे संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामीण रूग्णालय मंगळवेढा यांचे सौजन्याने
आज सोमवार दि.17 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत दामाजी मंदिर येथे मोफत भव्य कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष केशव जाधव यांनी दिली.
60 वर्षावरील दुसर्या डोसचे 9 महिने पुर्ण झालेल्यांना बुस्टर डोस
या शिबीरात 18 वर्षावरील सर्वांना पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असून 60 वर्षावरील दुसर्या डोसचे 9 महिने पुर्ण झालेल्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येणार आहे.
या शिबीराचे उदघाटन मंगळवेढयाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या हस्ते व तहसिलदार स्वप्निल रावडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव,
पोलिस निरीक्षक रणजित माने, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपक धोत्रे,डॉ.सुलोचना जानकर, श्री दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे
यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असून सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केशव जाधव यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज