टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात गाजलेले प्रकरण गुंतवणुकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून परतावा न देता फसवणूक व आथिर्क गैरव्यवहार केल्याप्रकरणी
मुख्य आरोपी विशाल अंबादास फटे (वय ३२) याच्यासह अंबादास गणपती फटे, वैभव अंबादास फटे, राधिका विशाल फटे, अलका अंबादास फटे (सर्व रा.बार्शी) यांच्याविरुध्द बार्शी शहर पोलिसांनी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
याप्रकरणी दिपक बाबासाहेब अंबारे (वय ३७, रा. बार्शी) याने बार्शी शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
यात केलेल्या आरोपानुसार, सन २०१९ मध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून फायदा करून देण्याच्या आमिषाने विशाल फटे याचे
विश्लका कन्सलंटसी प्रा.लि., अलका शेअर सव्हिसेस, जे. एम. फायनान्शियल सव्हिसेस यात विशाल फंटे, अंबादास फटे, वैभव फटे, अलका फटे यांची नावे असलेल्या कंपनीमध्ये रक्कमा गुंतविल्या.
यावेळी यांना ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दररोज २ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित होते.
विशाल फटेवर विश्वास ठेवून फिर्यादीने ९६ लाख ५० हजार, त्याचा भाऊ किरण अंबारे ५० लाख, त्याचा मित्र संग्राम मोहिते याने ३ कोटी ६० लाख २० हजार, रोहित व्हनकळस याने ३५ लाख, सुनिल जानराव याने २० लाख, हणुमंत ननवरे याने २ लाख असे एकूण ५ कोटी ६३ लाख २५ हजार रक्कमेची गुंतवणूक केली.
परंतु, ती काही काळानंतर पैसे परत मिळाले नसल्याने फसवणूक झाल्याने उघड झाले. यानंतर विश्र्वासघात व फसवणुक केल्याची फिर्याद बाशी शहर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी तपास पूर्ण करून बार्शी येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये एकूण १०१ साक्षीदारांची तपासणी केली आहेत.
दोषारोपपत्राप्रमाणे एकूण ५५९ गुंतवणुकदारांनी एकूण ४१ कोटी १४ लाख रूपयांची फसवणुक केल्याचे नमुद केलेले आहे.
सर्व आरोपी विरुद्ध भा.द.वि. कलम ४०९, ४२०, ४०६,४१७, ३७ व महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम ३ प्रमाणे दोषारोप पत्र दाखल करणात आले आहे.
यात आरोपी तर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. नितीन शिंदे, अॅड. वैष्णवी न्हावकर , अॅड. राहुल रूपनर, अॅड. शैलेशकुमार पोटफोडे तर सरकारपक्षातर्फे अॅड. बोचरे हे काम पाहत आहेत.(स्रोत:पुढारी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज