टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनामुळे ग्रामीण भागात पुन्हा चार जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५४ रुग्ण आढळून आले. यातील ५१ जण ग्रामीण भागातील आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी एकूण ४८३ चाचण्या केल्या. यातून ३ रुग्ण आढळून आले. यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेले चार जण बरे झाले.
अद्यापही ३२ जण क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत . जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने रविवारी एकूण २ हजार ४४९ चाचण्या केल्या . यातून ५१ रुग्ण आढळून आले.
यात बार्शी तालुक्यातील दोन , करमाळा ७ , माढा १४ , माळशिरस १० मंगळवेढा २ मोहोळ ६ पंढरपूर ४ , सांगोला तालुक्यातील सहा रुग्णांचा समावेश आहे.
दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर , अक्कलकोट या तालुक्यांमध्ये नव्याने रुग्ण आढळून आला नाही , असा दावा आरोग्य विभागाने केला. कोरोनामुळे ग्रामीण भागात चार जणांचा मृत्यू झाला.
यामध्ये लोखंड गल्ली , बार्शी येथील ६८ वर्षीय पुरुष , कोर्टी ता . करमाळा येथील ९९ वर्षीय महिला , उंबरे दहिगाव ता . माळशिरस येथील वर्षीय महिला , उचेठाण ता .मंगळवेढा येथील ७२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
दरम्यान , ग्रामीण भागात आजवर एकूण १ लाख ७३ हजार २३० कोरोना रुग्ण आढळून आले.(स्रोत:लोकमत)
म्युकरमायकोसिसचा आणखी एक रुग्ण
सोलापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराने बाधित असलेला आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. आजवर एकूण ६९६ रुगण आढळून आले. यातील ५७९ जण बरे झाले. या आजारामुळे आजवर १०१ जणांचा मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज