टीम मंगळवेढा टाईम्स ।
‘वीरश्री महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था या संस्थेचा उदघाटन समारंभ उद्या रविवार दि.28 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी यशराज कॉम्प्लेक्स बोराळे नाका येथे होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय भुसे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक नगराध्यक्षा सुनंदा आवताडे व अध्यक्षस्थान उद्योजक प्रसाद कुलकर्णी हे भूषविणार आहेत.

यावेळी नगरसेवक सोमनाथ आवताडे, सहाय्यक निबंधक व्ही.व्ही.वाघमारे, मराठवाडा शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष जयपाल शेखा शेरखाने, नारायणी पतसंस्था संस्थापक अरुण पवार, माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सत्यजित सुरवसे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, उद्योजिका डॉ.प्रियदर्शनी कदम, रुपाली दत्तू, अरुणा माळी, औद्योगिक वसाहत चेअरमन अँड.नंदकुमार पवार,

माजी मुख्याध्यापक तुकाराम मेटकरी, उद्योजक उमाकांत कनशेट्टी, नागेश डोके, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन धनंजय पाटील,

अमोल ज्वेलर्सचे मालक अमोल रत्नपारखी, माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्था चेअरमन रमेश डोके,

संगम विद्यालय मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे, राजमाता अर्बन बँकेचे संचालक पांडुरंग भाकरे, सजग नागरिक संघाचे अध्यक्ष संजय कट्टे, राजमाता अर्बन बँकेचे माजी संचालक डॉ.लक्ष्मण हेंबाडे आदीजन उपस्थित राहणार आहेत.

उद्या होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक दत्तात्रय विजय भुसे, चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाने केले आहे.

दरम्यान कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व संचालक मंडळ आणि सभासदांचे मोलाचं सहकार्य लाभले आहे

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














