मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
दरम्यान, हाच नाराज झालेला गट सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या गळाला लागल्याने आगामी काळात या गटाची भूमिका तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे.
अजित पवार यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून फारकत घेत सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटात सहभागी होत उपमुख्यमंत्रिपद मिळवले. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्याचा दौरा करताना मतदारसंघ पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मागील आठवड्यामध्ये मंगळवेढा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला. मात्र, सत्काराच्या निमित्ताने तीन ठिकाणी वेगवेगळे सत्कार झाल्यामुळे अजून राष्ट्रवादीतील गटबाजी संपली नसल्याचे दिसून आले असले तरी पदाधिकारी निवडीवरून नाराज झालेल्या राष्ट्रवादीचा गट मात्र त्यावेळी अलगद बाजूला होता.
आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेता शहरांमध्ये आपले राजकीय बस्तान मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने बुधवारी नाराज गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत शहरातील लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या महापुरुषाच्या पुतळ्यांच्या कामाची माहिती देत त्यांच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्याबाबत शब्द घेतला.
याचबरोबर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची जाणीव उपमुख्यमंत्र्यांना करून देताना तालुक्यातील राजकीय परिस्थितीची देखील जाणीव करून दिली. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड,
जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, बशीर बागवान, ज्ञानेश्वर भगरे, प्रकाश गायकवाड, राहूल सावंजी, सोमनाथ बुरजे, संभाजी घुले आदी यावेळी उपस्थित होते.
लतिफ तांबोळी व रामेश्वर मासाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे यापूर्वीच समर्थन केले. परंतू, त्यांना कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत पाठबळ दिले नव्हते. त्यामुळे अजित पवार यांचा गट मंगळवेढ्यात कमकुवत होता. पण आजच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नाराज गटाने उपस्थिती लावली.
हा गट अजित पवारांच्या गटाला मिळाल्यास त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसू शकतील. त्यामुळे हा नाराज गट आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्तेचा लाभ घेत शहरांमध्ये व तालुक्याच्या विकासामध्ये कोट्यवधीचा निधी उपलब्ध करू शकेल अशी परिस्थिती आजमितीला आहे.
त्यामुळे आगामी काळात हा गट विधानसभा निवडणुकीत कोणाला समर्थन करणार हे देखील पाहणे निर्णायक ठरणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज