मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमदेवारीवरून शेवटपर्यंत संघर्ष सुरू झाला. शेवटी प्रदेशाध्यक्षांना पंढरपुरात येऊन तोडगा काढावा लागला. पोटनिवडणुकीतही परिचारकांना मागे घेण्यास सांगितले. आता मात्र, परिचारक गटाच्या कार्यकत्यांनी निवडणूक लढविण्यावर ठाम होते.
मात्र, ऐनवेळी प्रदेशाध्यक्षांच्या आवाहनानुसार प्रशांत परिचारकांनी निवडणूक न लढविता आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत राहण्याचा शब्द दिला. त्यानंतर परिचारकांनी प्रचार सहभाग घेतला. आता समाधान आवताडे दुसऱ्यांदा आमदार बनले आहेत. ठरल्याप्रमाणे सर्व काही झालं आहे.
आता परिचारकांना कुठे संधी मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होताच परिचारकांना एक महामंडळ देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र, आता त्यांना आमदारकी कोठून मिळणार, याची चर्चा सुरु आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार
भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते तथा जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत प्रचारक यांनी माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा सत्कार केला. महायुतीच्या भव्य आणि ऐतिहासिक विजयानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकतीच मुंबई येथील त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपाने यंदाच्या विधानसभा निवडणूकीत दैदीप्यमान असे यश संपादन केले. त्यांनी या निवडणूकीमध्ये जवळ पास ६० ते ७० सभांचे आयोजन करुन भाजपा तसेच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. त्यामुळे भाजपाच्या घवघवीत यशा मध्ये फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे.
भाजपाच्या या दणदणीत विजयाबद्दल परिचारकांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रशांत परिचारक यांचे बंधू तथा युरोपियन शुगरसचे अध्यक्ष उमेश परिचारक देखील उपस्थित होते. या दोघांसमवेत पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील अन्य मान्यवर पदाधिकारी मंडळी देखील उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज