टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुका प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष व आ.बच्चू कडू यांचे विश्वासू समाधान हेंबाडे यांचा वाढदिवस होत असताना मंगळवेढा शहरातील करुणा मतिमंद शाळा व मूकबधिर प्रशालेत हेंबाडे परिवाराकडून खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी प्रशालेतील सुरवसे सरांनी आपल्या मनोगत व्यक्त करत असताना समाधान हेंबाडे यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
त्यांनी अंध, अपंग यांच्यासाठी जो लढा उभा केला आहे तो आम्ही जवळून बघत असतो त्यांनी तालुक्यातील अपंगांना न्याय मिळवून दिला आहे.
यापुढेही त्यांचे कार्य असेच राहो अशा त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यानंतर अध्यक्षीय भाषणात कृषिराज परिवाराचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी समाधान हेंबाडे यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून तालुका भर जाळे पसरविले आहे.
त्यांनी जे प्रहारच्या माध्यमातून काम केले आहे असे काम कोणीही करू शकत नाही प्रहार संघटना ही संपूर्ण तालुक्यातील खेड्यापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केली असल्यामुळे तालुक्यातील अपंगांना मोठ्या प्रमाणात न्याय मिळाला आहे.
त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातून राजकीय क्षेत्रात चांगली झेप घेतली आहे त्यांची ही राजकारणातील प्रगती अशीच वाढत जावो ही माझ्याकडून व माझ्या कृषिराज परिवाराकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो व दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अर्जुन मुद्गुल, कृषिराज परिवाराचे रणजीत वाडदेकर ,छावा परिवाराचे विकास मुद्गुल,
प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, राकेश पाटील ,शहराध्यक्ष आनंद गुंगे ,राम मेटकरी ,अंकुश सकट, नागेश मुद्गुल,
मनोज नागणे, संदीप भोसले, पिंटू कोळेकर ,दर्याप्पा कांबळे, समाधान हेंबाडे यांचे बंधू भारत हेंबाडे, सचिन हेंबाडे, दीपक हेंबाडे, अमोल शिंदे, अतीश लांडे,
सोमनाथ सावंजी ,दाजी लांडे ,रणजीत अडसूळ, अक्षय शिंदे, समर्थ शिंदे ,शुभम लेंडवे, व इतर मित्र परिवार उपस्थित होता यावेळी सूत्रसंचालन घोडके यांनी केले तर आभार नदाफ सर यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज