mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खा.शरद पवारांच्या आजच्या सरकोली दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष, असा असेल दौरा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 18, 2020
in सोलापूर
खा.शरद पवारांच्या आजच्या सरकोली दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष, असा असेल दौरा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा आज सरकोली दौरा असून सकाळी 10 वाजता ते सरकोली येथे येत आहेत. दि.28 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले.

त्यामुळे भालके कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा.शरद पवार आमदार भालके यांच्या गावी सरकोली येथे येणार आहेत. शरद पवार सांत्वनासाठी येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

बारामती येथून हेलिकॉप्टरने सकाळी साडे नऊ वाजता त्यांचे पंढरपूर येथे आगमन होणार आहे. तिथून मोटारीने ते सरकोली कडे जाणार आहेत.सकाळी 10 वाजता सरकोली येथे त्यांचे आगमन होणार असून 10 ते साडे दहा वाजे पर्यंत ते आ.भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेतील.

त्यानंतर परत मोटारीने पंढरपूर ला येऊन हेलिकॉप्टर ने बारामतीला प्रयाण ठेवतील. खा.पवारांच्या या सांत्वन दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा निवडणुक , 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन निवड तसेच आगामी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक या अनुषंगाने खा.पवार काही सूचना मार्गदर्शन करतील.

पुढची दिशा निश्चित करून जातील असे मानले जात आहे.यांच्या आजच्या होणाऱ्या सरकोली दौऱ्याकडे संबंधित जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

आज पवार यांच्या भेटीत तर भारत भालके यांच्यावर प्रेम करणारे अनेक त्यांचे सहकारी , पदाधिकारी, कार्यकर्ते सरकोलीकडे धाव घेणार असल्याचे समजले आहे.

आ.भालके यांची भेट आणि पवारांचे ते तीन प्रश्न

वेगवेगळ्या कामानिमित्त मुंबई येथे भारत भालके जात असत.यावेळी आवर्जून खा.शरद पवार यांची ते भेट घेत असत.

या भेटीप्रसंगी खा.पवार भालके यांना ‘भारत ‘ या नावाने बोलत असत. भालके हे पवार यांच्या समोर बसले की नेहमीचे ठरलेले तीन प्रश्न खा.पवार आवर्जून विचारत असत.

यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं काम कसं सुरू आहे.मतदारसंघात काय करत आहेस . तसेच तब्येत कशी आहे.या तीन प्रश्नांच्या उत्तरानंतरच इतर काही चर्चा होत असायच्या, असे खा.पवार यांच्या भेटीतील माहिती सांगत असताना आ.भालके हे आवर्जून सांगायचे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंढरपूरशरद पवार

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सदस्यांची जात वैधता पडताळणी होणार; सदस्यांची यादी मागितली

February 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

​सासूचा जीव घ्यायला निघाली, कुंकूच पुसलं गेलं! विषप्रयोग फसला, नराधम पत्नीचा सुसंस्कृत चेहरा बेनकाब; पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post
Breaking ! आता निवडणुकीनंतरच समजणार गावाचा सरपंच; आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगितीची शक्यता

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा