टीम मंगळवेढा टाईम्स ।
थंडीच्या धुक्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेचा २३ डिसेंबरचा मुहूर्त एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्टीकरण ‘फ्लाय ९१’ या कंपनीने सोमवारी दिले.
गोवा मुख्यालय असलेल्या फ्लाय ९१ या कंपनीने २३ डिसेंबरपासून गोवा ते सोलापूर, मुंबईत ते स सोलापूर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.
१० डिसेंबरपासून तिकीट बुकिंग सुरू होईल, असे कंपनीने म्हटले होते. कंपनीने सोमवारी एक निवेदन जारी केले. डिसेंबर अखेर ते जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत धुक्याचे वातावरण असते. या धुक्यांमुळे विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता पाहता २३ डिसेंबरचा मुहूर्त पुढे ढकलण्यात येत आहे.
सोलापूर विमानतळ हे प्रवासी विमानांच्या सेवेसाठी नवीन विमानतळ आहे. या काळात नवीन विमानसेवा सुरू करताना काळजी घ्यावी लागते, असेही कंपनीने म्हटले आहे.
विमानतळावर इंधन भरण्याची सुविधा आवश्यक असल्याचे कंपनीने एअरपोर्ट अथॉरिटीला कळवले होते. विमानतळावरील सर्व अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे फ्लाय ९१ या कंपनीने म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज