मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महासिद्ध मंदिराच्या लोखंडी ग्रीलचे कडीचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने दानपेटीतील अंदाजे ५ हजार रुपये चचोरुन नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
फिर्याद प्रवीण कुमार अर्जुन जतकर क्य ४७ रा. डोणज यांनी दिली आहे. ही चोरीची घटना दि.२५ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते २६ ऑगस्ट च्या पहाटे ३:३० च्या दरम्यान घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, फिर्यादी प्रवीणकुमार अर्जुन जतकर हे गोवर्धन शेतकरी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे सचिव असून दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी नेहमीप्रमाणे पतसंस्था बंद करून गेले.
दि. २६ ऑगस्टच्या पहाटे ३:३० च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने गावातील श्री महासिद्ध मंदिराचे समोरील लोखंडी ग्रीलचे कडीचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरातील दानपेटीमधील अंदाजे ५ हजार रुपये लबाडीने चोरून नेले.
तसेच गोवर्धन शेतकरी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पथसंस्थेचे शटर एका बाजुने उचकटुन शटर उघडण्याचा प्रयत्न केला आहे. व पोस्ट ऑफीस चा दरवाज्याचे कुलुप तोडुन आत मध्ये प्रवेश केला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज