टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील भांडणाचा राग मनात धरून काठीने मारून जखमी केल्याप्रकरणी सहा जणांना सहा महिन्यांच्या कैद व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विलास श्यामराव खांडेकर, पंडित श्यामराव खांडेकर, रणजित पंडित खांडेकर, राजू पंडित खांडेकर, सुवर्णा पंडित खांडेकर (सर्व रा. खोमनाळ, ता. मंगळवेढा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
मंगळवेढा येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एस एन गंगवाल शाह यांनी शिक्षा सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी, दि. १० डिसेंबर २०१८ रोजी फिर्यादी दत्तात्रय संदीपान खांडेकर हे खोमनाळ येथील राहत्या घरी असताना विलास खांडेकर हा दारू पिऊन येऊन घरासमोर गोंधळ करत होता.
फिर्यादी घराबाहेर आल्यावर त्याने मोबाइलवरून फोन करून रणजित पंडित खांडेकर यास बोलावून घेतले. आल्यानंतर त्याने चुलते विलास खांडेकर यांच्याबरोबर भांडण का सुरू आहे, असे विचारले असता फिर्यादीने चुलत्यालाच विचार असे म्हटले.
तेथे पंडित शामराव खांडेकर व त्याचा मुलगा राजू पंडित खांडेकर, पत्नी सुवर्णा पंडित खांडेकर हे मोटरसायकलवरून आले व जुन्या भांडणाचा राग मनात धरून काही न बोलता राजू खांडेकर, सुवर्णा खांडेकर यानी फिर्यादीच्या पाठीवर व हातावर काठीने मारहाण केली.
त्यावेळी फिर्यादीची पत्नी मंगल ही पतीस सोडवण्यासाठी गेली असता सुवर्णा हिने शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याची फिर्याद दत्तात्रय खांडेकर यांनी दाखल केली होती. सरकारतर्फे अॅड.धनंजय बनसोडे यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज