टीम मंगळवेढा टाईम्स ।
दर महिन्याला १ लाख रुपये कमावण्याच्या आमिषाला बळी पडून एका महिलेची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच वडगाव शेरी परिसरात घडला.
यासंदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ यादरम्यान घडला. याप्रकरणी वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे.
या महिलेला अज्ञात मोबाइल क्रमांकावरून मेसेज आला. घरबसल्या डिजिटल मार्केटिंग करून १ लाख रुपये कमावू शकतात, असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर वेगवगेळी टास्कची माहिती देऊन तुम्ही कोणता टास्क निवडला असे सांगितले.
महिलेने १५० रुपयांचा टास्क निवडल्याचे सांगितले. त्यानंतर एका टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड/ करून १५० रुपयांचा टास्क देण्यात आला.
या भामट्याने सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून महिलेला ५ लाख ४७ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. मात्र, त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज