टीम मंगळवेढा टाईम्स ।
भैरवनाथ शुगर वर्क्स लि., युनिट नं.३, लवंगी, या कारखान्याने चालु गळीत हंगाम २०२५-२६ मधील १५ नोव्हेंबर पर्यन्तचे ऊसाचे बिल प्रति मे. टन २८०० रु. प्रमाणे शेतकरी ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा केल्याची माहिती भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली.
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे संस्थापक, माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, आ.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली व चेअरमन अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली

२०२५-२६ च्या चालू हंगामातील गाळप सुरू झाले असून शेतकऱ्यांना पहिली उचल २८०० प्रती मे.टन ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा सर्व ऊस गाळपासाठी प्रोग्राम

प्रमाणे आणला जाणार असून चांगल्या प्रतिचा ऊस पुरवठा कारखाण्यास करावा असे आवाहन भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी केले.
तसेच एफआरपी पेक्षा जास्त दर आता पर्यन्त दिलेला आहे. शेतकऱ्यांनी आजपर्यंत दाखवलेल्या विश्वासावरच भैरवनाथ शुगरचे विक्रमी गाळप होईल असे त्यांनी सांगितले.

अनिल सावंत म्हणाले की भैरवनाथ शुगरने सुरुवातीपासुन ऊस उत्पादकांशी असलेली बांधिलकी कायम ठेवत शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता व दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचे काम भैरवनाथ शुगर ने केले आहे.

तसेच सर्व शेतकरी बांधवांनी भैरवनाथ शुगरला जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

चेअरमन अनिल सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले की, ‘शेतकऱ्यांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही, यासाठी कारखान्याचे व्यवस्थापन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा परिपक्व ऊस कारखान्यास गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही चेअरमन अनिल सावंत यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













