टीम मंगळवेढा टाईम्स । माढा तालुक्यातील दारफळ सीना येथे दोन गटात चारी खोदण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत परस्परांविरुद्ध १३ जणांवर माढा पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. Fighting in two groups at Darfal Cena; Crimes against 13 persons
दि.६ रोजी सकाळी १०.३० वाजता भावना आनंद उबाळे , मंगल बाळासाहेब ऊर्फ विनायक उबाळे , वृषाली अमोल उबाळे , अर्चना शिंदे , वृषालीची आई ( नाव माहीत नाही ) , आनंद बाळासाहेब उबाळे , अमोल बाळासाहेब उबाळे ( सर्व रा . दारफळ सीना ) यांनी फिर्यादीच्या गावठाणातील प्लॉटजवळ मारुती उबाळे , ज्ञानेश्वर ओंकार उबाळे यांना मारहाण केली , अशी फिर्याद लक्ष्मी मारुती उबाळे यांनी माढा पोलीस ठाण्यात दिली आहे.
आनंद बाळासाहेब उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले , मारुती आप्पाराव उबाळे , लक्ष्मी मारुती उबाळे , ज्ञानेश्वर मारुती उबाळे , ओंकार मारुती उबाळे , विमल महादेव उबाळे , सागर महादेव उबाळे ( सर्व रा . दारफळ सीना ) यांनी जमाव जमवून ही जागा तुझ्या बापाची आहे का , असे म्हणून शिवीगाळ करून माझी पली , भाऊ , बहिनी व आई यांना मारहाण केली.
पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक शेख व पोलीस नाईक विशाल पोरे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज