टीम मंगळवेढा टाईम्स।
यंदा पाऊस चांगला पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याने खरीप पेरणी क्षेत्रातही वाढ होईल, असे गृहीत धरून रासायनिक खतांची उपलब्धता केली जात आहे.
सध्या विविध प्रकारचे एक लाख ३५ हजार मेट्रिक टन खत शिल्लक असून, खताच्या किमतीत कसलीही वाढ झाली नसल्याने जुन्याच दराने शेतकऱ्यांनी खते घ्यावीत, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे.
यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे खरीप पेरणीच्या सरासरी क्षेत्रात वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी विविध प्रकारचे रासायनिक खत दोन लाख ३० हजार मेट्रिक टन मंजूर करण्यात आले आहे.
त्यापैकी एक लाख ५४ हजार मेट्रिक टन खत एक एप्रिलपासून आले आहे. त्यापैकी १८ हजार ६५५ मेट्रिक टन खताची आतापर्यंत विक्री झाली आहे. उर्वरित एक लाख ३५ हजार मेट्रिक टन खत शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून युरियाची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. हे लक्षात घेता ६० हजार मेट्रिक टन खताची आतापर्यंत उपलब्धता झाली असून,
त्यापैकी ५० हजार मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. युरियानंतर डीएपीला शेतकऱ्यांचे प्राधान्य असल्याने ७८२४ मेट्रिक टन डीएपी एप्रिलपासून उपलब्ध झाला असून, विक्री होऊन ६ हजार मेट्रिक टन शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
खतांच्या दरात कसलीही वाढ झालेली नाही.
जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला तर नवीन लागवड होईल, अशा वेळी खते गरजेची असल्याने आवश्यक खतांची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय खतांच्या दरात कसलीही वाढ झालेली नाही. अधिक दराने खत विक्री होत असेल तर कारवाई करण्यात येईल.-दत्तात्रय गवसाने, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी
संरक्षित साठ्यात १५४६ टन खत
आगामी खरीप हंगामात टंचाई भासू नये व शेतकऱ्यांना आवश्यक त्यावेळी पुरवठा करण्यासाठी युरिया व डीएपी या खतांचा १५४६ मेट्रिक टन संरक्षित साठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली,
बैठकीला १२ खत कंपन्यांचे प्रतिनिधी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक धनंजय पाटील, राहुल गायकवाड, झेड.पी.चे कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, चंद्रकांत मंगरुळे, सागर बारवकर, रामचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.(स्त्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज