मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मानसिक तणावाखाली येऊन एका सोळा वर्षीय युवकाने पत्र्याच्या घरात लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
रितेश लक्ष्मण कांबळे (वय १४) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना गुरुवारी रात्री सातच्या सुमारास आलेगाव (ता. सांगोला) येथे घडली.
याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, मृत रितेशचे वडील लक्ष्मण कांबळे यांचे आजारपणात सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मुलगा रितेशनेही आत्महत्या केली.
रितेश हा इयत्ता १० वी शिकत होता; पण त्याला जमीन, स्वतःचे हक्काचे घर नव्हते. तसेच हलाखीच्या परिस्थितीमुळे तो मानसिक तणावाखाली होता.
गुरुवारी नातेवाईक वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला गेल्याची संधी साधून रितेशने रात्री सातच्या सुमारास घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज