मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
अभ्यास करत नाही, बाहेर सारखा खेळत असतोस, तू तुझ्या आईच्याच वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय, असे म्हणत बापाने मुलाला भिंतीवर आपटत त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना होळ (ता. बारामती) येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी विजय गणेश भंडलकर, शालन गणेश भंडलकर, संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी (दि. १४) अडीच वाजेच्या सुमारास नऊ वर्षाचा पीयूषला भिंतीवर आपटत त्याचा गळा दाबून खून केला. हे सगळे होत असताना आई शालन गणेश भंडलकर यांनी
सदरची घटना पाहूनदेखील आपला पती विजय भंडलकर यास प्रतिबंध केला नाही. त्याच्या सांगण्यानुसार पीयूष हा चक्कर येऊन पडला आहे, अशी खोटी माहिती दिली.
तसेच यातील संतोष भंडलकर यानेदेखील निरा येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे विजय भंडलकर यांच्या सांगण्यानुसार पीयूष हा चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती दिली. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.
पुरावा नष्ट करण्याचा उद्देश
डॉक्टरांनी पीयूष हा मयत झाल्याचे सांगून त्याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन जाण्यास सांगितले. ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. त्याबाबतचा पुरावा राहता कामा नये यासाठी त्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथे घेऊन न जाता गावी घरी घेऊन गेले.
पीयूष विजय भंडलकर (९ वर्षे, रा. होळ, ता. बारामती) याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे पोस्टमॉर्टम न करता त्याचा अंत्यविधी करण्याची तयारी केली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज