मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पत्नीला नांदावयास पाठवित नाहीत, या शिवाय माझ्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. या गोष्टीचा राग मनात धरून जावयाने सासुरवाडीत जाऊन घराच्या अंगणात झोपलेल्या सासऱ्याचा चाकूने वार करून खून केला.
तर, सोडविण्यास आलेल्या मेहुणा व सासूवरही चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथील काळे वस्तीवर २७ एप्रिल रोजी रात्री घडली.
बापूराव तुळशीराम मासाळ (वय ५३) असे त्या मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत बापूराव मासाळ यांच्या फिर्यादीवरून मंगेश देविदास सलगर (वय ३५) याच्याविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बापूराव यांच्या मुलीचा विवाह कोळेगाव येथील मंगेश याच्याशी झाला होता. दरम्यान मागील तीन वर्षांपासून मंगेश याची पत्नी निशा आई-वडिलांकडेच राहत होती. याशिवाय जावयाच्या विरोधात न्यायालयात दावाही दाखल केला होता.
या रागाच्या भरातच दिनांक २७ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बापूराव मासाळ हे घराच्या बाहेर अंगणात झोपले होते, तर मेहुणा अभिषेक मासाळ हा गोठ्यात झोपला होता व सासु आशा मासाळ या घरात झोपल्या होत्या.
आरोपीने धारदार चाकूने सासऱ्याच्या तोंडावर, अंगावर व पायावर भोकसून वार करून जिवे ठार मारले. आवाज आल्याने वडिलांना सोडवण्यासाठी गेलेला मेहुणा अभिजीत मासाळ व सासू आशा मासाळ या दोघांनाही चाकू भोसकून गंभीर जखमी केले.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे, पोलिस उपाधीक्षक संकेत देवळेकर, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी भेट दिली. फॉरेन्सिक लॅबच्या टीमने त्या ठिकाणचे फिंगरप्रिंट्स घेतले आहेत. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
आरोपी हा अंगाला रक्त लावत बसला होता
आरोपी हा घटनास्थळावरून निघून न जाता तिथे सांडलेल्या रक्ताच्या थारोळ्यातील रक्त स्वतःच्या अंगाला लावून तेथेच बसला होता. पोलिस स्टेशनच्या ११२ वर कॉल करून मला या ठिकाणी पाच-सहा जणांनी मारले आहे. मला वाचवायला ताबडतोब या, असा कॉल करून जागीच थांबला होता.
घरात लगीन घाई सुरू होती
मंगेशची पत्नी निशा घरातच होती. भीतीपोटी ती बाहेर आली नाही. निशाच्या थोरल्या भावाचे लग्न ६ मे रोजी ठरले आहे. लग्नाच्या पत्रिका वाटप झाल्या होत्या. घरात लगीन घाई सुरू होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज