टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यासाठीचा शासन आदेश आज जारी करण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रात कांद्याचे भाव कवडीमोल झाले आहेत. अशा परिस्थितीत मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी कांदा अनुदान दिले जाणार आहे. या योजनेमुळे आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार,पणन व वस्त्रोउध्योग विभागाच्या शासन निर्णया नुसार कृषि उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा च्या बाजार आवारा मध्ये
दि.१ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील कांदा विक्री केलेल्या शेतकर्यांनी कांदा अनुदानाचे प्रस्ताव बाजार समितीच्या कार्यालयामध्ये सादर करावे असे आवाहन सचिव सचिन देशमुख यांनी केले आहे.
सदर अनुदानासाठी प्रती क्विंटल ३५० रुपये तसेच जास्तीत जास्त प्रती शेतकऱ्यास २०० क्विंटल पर्यन्त अनुदान देणेत येणार आहे. सर्व कांदा विक्री करणारे शेतकरी या योजने साठी लाभ धारक असतील.
शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची छाननी शासन स्तरावर झालेनंतर अनुदानाची रक्कम ही त्या शेतकर्यानी दिलेल्या त्यांच्या बँक खात्यावरती शासनाकडून जमा करण्यात येणार आहे.
कांदा अनुदानासाठीचे प्रस्ताव शेतकर्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती मंगळवेढाच्या आवारा मध्ये कांदा विक्री केलेली शेतकरी पट्टी, ७/१२ उतारा, बँक खाते नंबर इत्यादी सह साध्या कागदावरती कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढाच्या नावाने अर्ज सादर करावे.
तसेच एखाद्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व कांदा विक्री पट्टी मुलाच्या नावे किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तिच्यां नावे असेल तर ७/१२ उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आहे अश्या प्रकरणात वडील व मुलगा किंवा कुटुंबातील
अन्य व्यक्तीच्या सहमतीने बाजार समितीकडे शपथ पत्र सादर केले नंतर ७/१२ उतारा ज्यांच्या नावाने असेल त्यांच्या खात्यावरती सदरची अनुदान रक्कम शासनाकडून वर्ग करण्यात येईल. शेतकर्यांनी कांदा अनुदानाच्या अधिक माहिती साठी बाजार समिती मंगळवेढाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
सबंध महाराष्ट्रात कांद्याचे भाव कवडीमोल झाले आहेत.अशा परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी कांदा अनुदान योजनेमुळे आर्थिक पाठबळ मिळणार आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावाअसे अवाहन सचिव सचिन देशमुख यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज