टीम मंगळवेढा टाईम्स ।
भैरवनाथ शुगर वर्क्स लवंगी ता.मंगळवेढा, विहाळ ता.करमाळा तसेच आलेगाव ता. माढा या तिन्ही साखर कारखान्यांना २०२३-२४ या हंगामात
ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना पहीला हप्ता २७२५ रूपये देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत व व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी दिली.
सध्या सोलापूर जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा सुरू झाली आहे. आजपर्यंत भैरवनाथ शुगरने इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्याचा प्रयत्न केला आहे. आजही भैरवनाथ शुगर शेतकऱ्यांचा कारखाना म्हणून ओळखला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील लवंगीसह विहाळ व आलेगाव या सर्व कारखान्यांनी ऊस उत्पादकांना चांगला दर दिला आहे.
आजपर्यंत शेतक-यांनी भैरवनाथ शुगरच्या सर्वच युनिटवर विश्वास ठेवून सहकार्य केले असून २०२३-२४ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकर्यांनी भैरवनाथ शुगरच्या सर्वच कारखान्यास चांगल्या दर्जाचा ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज