टीम मंगळवेढा टाईम्स ।
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता शासकीय नुकसान भरपाई मिळवून देणार असून, अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामाचा अहवाल शासनाला सादर करावा जेणेकरून त्या संदर्भात पाठपुरावा करता येईल अशी ग्वाही आ.समाधान आवताडे यांनी दिली.
गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या रब्बी हंगामातील द्राक्ष,कांदा, ज्वारी, मका या पिकाची पाहणी करण्यासाठी आज आ. आवताडे यांनी मंगळवेढा शिवारात पाहणी दौरा केला.
त्यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, दिगंबर यादव, तहसीलदार मदन जाधव, प्रभारी कृषी अधिकारी अश्विनी शिंत्रे, कृषी सहाय्यक प्रशांत काटे, रावसाहेब फटे, मंडळाधिकारी व तलाठी यावेळी उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे तालुक्यामध्ये द्राक्ष, कांदा ज्वारी, मका या पिकाचे नुकसान झाले.
वर्षातून एकदा घेतले जाणाऱ्या ज्वारीच्या शिवाराला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम ज्वारीच्या उत्पन्नावर होणार आहे. त्याचबरोबर द्राक्ष पिकाची तशीच अवस्था झाली तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला.
त्यामुळे या घटनेचे तात्काळ गांभीर्याने आ. समाधान आवताडे यांनी संबंधित विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.
परंतु, काल स्वतः त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर पाहणी दौरा केला या दौऱ्यामध्ये मंगळवेढा शिवारातील रब्बीच्या कोठारात ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सध्या शासकीय स्तरावर प्राथमिक स्वरूपात 6000 हेक्टरचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली असून उर्वरित दोन दिवसात प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर तालुक्यातील नुकसानाची प्रत्यक्ष आकडेवारी समोर येणार आहे.
नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केल्यानंतर या बाधित शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण तत्पर असून त्या दृष्टीने हिवाळी अधिवेशनात मदतीची कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.- आ.समाधान आवताडे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज