मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
उजनी व वीर धरणातून अतिरिक्त पाणी भिमा नदीच्या पात्रात 1 लाख 87 हजार 850 क्युसेक सोडल्याने तालुक्यातील नदीकाठच्या गावाला पुराचा तडाका बसला. यामध्ये नदीकाठची हातातोंडाशी आलेली पिके सध्या पाण्यात गेल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखीनच भर पडली.
गेल्या दिवसापासून पुणे परिसर व नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्याने या परिसरातील वीर व उजनी धरणातील पाणी नीरा व भिमा नदीत आल्याने भिमा नदीत 1 लाख 87 हजार 850 क्युसेक्सने गुरुवारी वाहत आहे.
यंदा दोन वेळा भिमा नदी पुर सदृश्य परिस्थितीत वाहिली. मे च्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यामुळे भिमा नदी धोक्याच्या पातळीत वाहत होती.
मध्यंतरी आलेल्या पाण्यामुळे वडापूर -सिध्दापूर को.प. बंधार्याचा भरावा वाहून गेला होता. नागरिकांच्या मागणीनंतर हा भरावा पुन्हा टाकण्यात आला.
मात्र सध्या आलेल्या पाण्यामुळे पुन्हा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील भिमा नदी काठी उचेठाण,बठाण, माचणूर,अरळी,वडापूर,सिध्दापूर, आदी को.प. बंधारे पाण्याखाली गेले असून तिर्थक्षेत्र सिध्देश्वर मंदिरातील श्री जटाशंकर मंदिरही पाण्याखाली गेले.
दरम्यान सध्या पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात जावू नये असे आवाहन भिमा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीशैल हालकुडे यांनी आवाहन केले.
दरम्यान पुराने वेढा दिल्यामुळे तालुक्यातील ऊस, कांदा, केळी, डवळ,डाळिंब,द्राक्ष,मका,भाजीपाला या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.तर तहसीलदार मदन जाधव यांनी नदीकाठचे मंडल अधिकारी व तलाठी यांना पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या.
सतत पडणाऱ्या पावसामुळे आधीच फळबागाचे नुकसान झाले आहे, त्यात ऊजनी व विर धरणातुन सोडलेल्या पाण्यामुळे सिद्धापुर येथील ऊस, उडीद, केळी इत्यादी पिकासह मका, कडवळ सह जणावरांचे चारा पण पाण्याखाली गेल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, तरी शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावे.
सिद्धापूर येथील वडापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने या परिसरातील नागरिकांचा मंगळवेढा व मोहोळ तसेच दक्षिण सोलापूर या तालुक्याशी असणारा संपर्क या निमित्ताने तुटला.
नदीपात्रातील पाणी नजीकच्या बागायत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान कारणीभूत ठरणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडले आहे. त्याचा इशारा सतर्कतेचा दिला असला तरी नुकसानीबाबत कोण गांभीर्याने घेणार असा सवाल या भागातील शेतकऱ्यातून विचारला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज