मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे जनावरांना पाणी पाजण्यासाठी हौदात पाणी भरत असताना विद्युत मोटारीचा करंट लागून
संतोष शिवशंकर रामपुरे (वय ४०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची मंगळवेढा पोलीसात अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
पोलीस सुत्राने दिलेली माहिती अशी, यातील खबर देणारे मयताची पत्नी मिनाक्षी संतोष रामपुरे (वय ३५) हिस दि.१९ रोजी सकाळी १०.३० वाजता यातील मयत याने मी जनावरांना पिण्यासाठी हौदात पाणी भरतो असे म्हणून मयत हे हौदाकडे पाणी भरण्यास गेले.
काही वेळातच त्यांचा मोठमोठ्याने ओरडल्याचा आवाज आल्याने पत्नी मिनाक्षी ही घटनास्थळी गेली असता इलेक्ट्रीक वायरला चिटकलेले दिसले. वायर ओढून पत्नीने बाजूला केली.
तद्नंतर शेजारी गजानन नांगरे व सिद्राम चौगुले हे पळत आले. ज्ञानेश्वर कपाले यांना कॉल करुन बोलावून घेवून बेशुध्द अवस्थेत बोराळे येथील स्वामी हॉस्पिटल मध्ये नेले.
तद्नंतर अधिक उपचारासाठी मंगळवेढ्याला पाठविण्यात आले मात्र औषध उपचारापुर्वीच ते मयत झाले असल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषीत केले. याचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज