मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील तसेच सोलापूर शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह राज्यातील सहा पदाधिकारी सोलापूर शहरातील चौघांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याची कारवाई सोमवारी करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्यासह नऊ जणांचा शपथविधी होताच सोलापूर शहरात अजित पवार समर्थक संतोष पवार, जुबेर बागवान यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला होता.
तर कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांचे समर्थन केले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आपण शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले.
दरम्यान सायंकाळी, जुबेर बागवान यांच्यासह राज्यातील इतर सहा पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचे पत्र प्रदेश युवकाध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
तर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षांवरील कारवाई शहराध्यक्ष भरत जाधव यांनी प्रसिद्धीस दिले आहे. यामध्ये उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव, मध्य विधानसभा अध्यक्ष तन्वीर गुलजार व
दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमर शेख यांचा समावेश आहे. पदावरून तातडीने हटविण्यात येत असल्याचे या पत्रात नमुद करण्यात आले. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज