mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा पोलिस दलात खळबळ! पोलिस अधिकाऱ्यांनी तरुणाला मारहाण करून पैसे काढून घेतल्याची तक्रार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 3, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मित्राला रात्रीच्यावेळी आणावयास गेलेल्या अजय सुरेश आसबे (रा.मंगळवेढा) याला गस्त पथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे साहेब व पोलिस गाडीच्या चालक नलावडे यांनी पोटात मारहाण करून खिशातील बचत गटासाठी ठेवलेले १७०० रुपये काढून घेतल्याची तक्रार सदर व्यक्तीने मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक यांचेकडे करून संबंधित घटनेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अजय आसबे याने दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, दि .३१ जुलै रोजी रात्री १.३० वा. त्याचा मित्र लखन आवताडे हा चहा कँटीन चालवत असून त्याला टोळ नाक्यावरून आणण्यासाठी मोटर सायकलवर गेलो होतो.

या दरम्यान गस्तीपथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे साहेब यांनी तू रात्री का फिरत आहेस अशी विचारणा करून पोलिस स्टेशनला नेले.तेथे अधिकारी व सदर चालकाने तु खोटे बोलत आहेस असे म्हणून पोटावर दोन लाथा मारल्या.

तु चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहे असा गुन्हा दाखल करतो, गुन्हा दाखल करायचा नसल्यास तुला दोन हजार रुपये दयावे लागतील असे ते म्हणाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

माइया खिशात बचत गटाचा भरणा करण्यासाठी आईने दिलेले १७०० रुपये होते. ते काढून घेवून मला सोडून दिले.पोटात मारहाण केल्यामुळे पोट दुखीचा त्रास होत असून मला कोणतेही खाल्लेले अन्न पचत नसल्याचे त्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले असून याची चौकशी होवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आसबे यांनी केली आहे.

या तक्रारीची प्रत मंगळवेढयाचे डी.वाय.एस.पी. यांचेकडे माहितीस्तव दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे मंगळवेढा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

यापुर्वीही १६ लाखाचे गुटखा प्रकरण , आरोपी बोकड मटन पार्टी प्रकरण या घटनांमुळे चर्चेत असलेले मंगळवेढा पोलिस पुन्हा या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत.

मंगळवेढा पोलिस दलात खळबळ! पोलिस अधिकाऱ्यांनी तरुणाला मारहाण करून पैसे काढून घेतल्याची तक्रार @Info_Solapur @TejaswiSatpute @SpSolapurRural @Dwalsepatil @Dev_Fadnavis @DeshmukSubhash @samadhanautade1 @bharanemamaNCP @AtulZende1 pic.twitter.com/E1m3UQeBxA

— Mangalwedha Times (@SamadhanFugare) August 3, 2021

पोटात लाथा मारल्याने मला पोटदुखीचा त्रास सुरु

मी मित्राला रात्रीच्यावेळी टोळ नाक्यावर आणावयास गेलो होतो. सहाय्यक पोलिस निरिक्षक व वाहन चालकाने मला पकडून पोलिस स्टेशनमध्ये नेले. येथे पोटात लाथा मारल्याने मला पोटदुखीचा त्रास सुरु आहे.बचत गटाचे खिशातील १७०० रुपये काढून घेतले : अजय आसबे, तक्रारदार , मंगळवेढा.

चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल

सदर घटनेचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला असून या तक्रारीची चौकशी सुरु आहे.खरच पोटदुखीचा त्रास आहे का ? याची डॉक्टरांच्या रिपोर्टवरून चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल : जोतीराम गुंजवटे , पोलिस निरिक्षक , मंगळवेढा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशनसोलापूर

संबंधित बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
Next Post
अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उन्हाळा फेस्टिव्हलला सुरुवात!

एक्सचेंज मेळावा! चक्क 3 हजार ते 21 हजारापर्यंत सूट; जुना टिव्ही, फ्रिज, मोबाईल, एसी व वॉशिंग मशीन घेऊन या आणि नवीन घेऊन जावा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..