टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका वगळता जिल्ह्यातील दहा तालुके कोरोनामुक्त असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. शहरातही कोरोनाचा केवळ एक सक्रिय रुग्ण आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी एकूण ९२ कोरोना चाचण्या केल्या. यातून एकही रुग्ण आढळून आला नाही.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला चार सक्रिय रुग्ण होते. यातील तीन रुग्ण बरे झाले. आता केवळ एक सक्रिय रुग्ण आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शनिवारी एकूण ५८ कोरोना चाचण्या केल्या. यातून एकही रुग्ण ळून आला नाही. यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या दोन जणांना डिस्चार्ज मिळाला.
सध्या केवळ एक सक्रिय रुग्ण आहे. सहा जणांचे अहवाल प्रलंबित आहेत केवळ सांगोला तालुक्यातच एक सक्रिय रुग्ण आहे.
मात्र विविध भागात ५२ जण होम क्वारंटाइन असल्याचा दावा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांनी केला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची एकूण संख्या रविवारअखेर १ लाख ८६ हजार ५७ झाली. यापैकी १ लाख ८२ हजार ३३० जण बरे झाले.
मृतांची एकूण संख्या ३७२६ आहे. शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ६६६ झाली. यापैकी ३२ हजार १६० जण बरे झाले. मृतांची एकूण संख्या १५०५ आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज