टीम मंगळवेढा टाईम्स ।
हा एप्रिल महिना आणि त्यानंतरचा कालावधी ग्राहकांना रडवणार आहे. कारण, 2021 मधील एप्रिलच्या सुरूवातीपासूनच आपले खिसे आणखी जास्त प्रमाणात मोकळे केले जाणार आहेत.
मोबाईलसह अनेक वस्तूमध्ये भाववाढ होणार असल्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार मोबाईल फोनचे सुटे भाग आणि चार्जर्ससह अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय झाला आहे.
दरम्यान या सर्व वस्तू मंगळवेढा शहरातील चेलेकर गल्ली येथे असलेले अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून वेगवेगळ्या ऑफर्सच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.
याचा परिणाम आज 1 एप्रिलपासून थेट सर्वसामान्यांना बसणार आहे.सरकारच्या या निर्णयामुळे अनेक गॅझेट्स आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने जसे की चार्जर, केबल, इलेक्ट्रॉनिक उत्पादने मोबाइल फोनसह महाग होतील.
आज 1 एप्रिल 2021 पासून याचे प्रभावी दर लागू होणार आहेत. कोणत्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर किती आयात शुल्क वाढविण्यात आले आणि किती किंमती वाढू शकतात त्याची माहिती पुढे दिलेली आहे.
2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांपैकी वायर (सर्व प्रकारच्या तारा, केबल्स) यावरील आयात शुल्क सध्या 7.5 टक्के न ठेवता आता 10 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. 1 एप्रिलपासून वायरच्या किंमती 2.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.
चार्जर, अॅडॉप्टर आणि इतर सामान यांच्याही किमती वाढणार आहेत. अर्थसंकल्पात सरकारने चार्जर, अॅडॉप्टर्स आणि केबल्ससारख्या उत्पादनांवरील आयात 2.5 टक्क्यांवर आणले आहे.
जे सध्या शून्य आहे. त्याच वेळी, चार्जरमध्ये वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या शुल्कातही 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत चार्जर, केबल्स, अॅडॉप्टर्स आणि यूएसबी सामानांचे दर वाढतील.
कनेक्टर्स आणि कॅमेरा सेटअपमध्ये वापरल्या जाणार्या प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली (पीसीबीए) वर आयात शुल्क 15 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्याने हाय एंड आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत चांगला कॅमेरा आणि टाइप-सी पोर्ट असलेले फोन महाग होतील.
आता फोन दुरुस्त करणेदेखील महाग होईल. कॅमेरा, कनेक्टर आणि इतर भाग महाग झाल्यावर आणि लिथियम-आयन बॅटरीवर आयात शुल्क वाढविण्यात आल्यावर बॅटरी बदलणेही महाग होईल.
फोनच्या सर्किट, कॅमेरा सेटअप, चार्जिंग पोर्टवरील आयात शुल्क 2.5 टक्के आणि चार्जर व चार्जरचे सुटे भाग यांच्यात 15 टक्के करवाढ झाली आहे.
सॅमसंग आणि इतर कंपन्या फोनसह बॉक्समध्ये असणारा चार्जर, हेडफोन आणि केबल देखील बंद करू शकतात. अशा परिस्थितीत आपला फोन चार्ज करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र चार्जर घ्यावा लागेल. म्हणजेच आज 1 एप्रिलपासून त्याचाही महागाईत समावेश होईल.
एसीवरील ड्युटी 12.5% वरून 15% करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एसीच्या किंमती वाढणार आहेत. फ्रिजवरील शुल्कही 15 टक्क्यांपर्यंत केले आहे.
याशिवाय एलईडी दिव्यावरील ड्युटीदेखील 5 वरून 10 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय फॅन, वॉशिंग मशीन वगैरे खरेदीही महाग होणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज