मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सूर्योदय उद्योग समूह संचलित सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर घेतलेले सर्वच उपक्रम अत्यंत कौतुकास्पद, राष्ट्रहिताचे आणि समाजाला दिशा देणारे असल्याचे गौरवोद्गार पुणे येथील सुप्रसिद्ध विनोदी वक्ते अशोक देशमुख यांनी काढले.
अनिलभाऊ इंगवले आणि त्यांच्या टीमने इथे मोठ्या संख्येने ज्येष्ठ व्यक्तींना एकत्र बोलावून माझ्यासारख्या एका ज्येष्ठ व्यक्तीला त्यांच्यात मिसळण्याची संधी दिली असे सांगत छोट्या छोट्या गोष्टीतून विनोदाची निर्मिती करत त्याचबरोबर आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देत उपस्थितांना सुमारे तासभर त्यांनी मंत्रमुग्ध केले.
यावेळी सर्व उपस्थितांची हसता हसता पुरेवाट झाली. उपस्थित सर्वांनी यावेळी नृत्यांमध्ये देखील सहभाग घेत कार्यक्रमाला प्रचंड दाद दिली. सुरुवातीला सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
त्यामध्ये एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बन यांची वाटचाल सांगत सूर्योदयने आजपर्यंत केलेल्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्य असलेल्या तपस्वींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे भाग्य आम्हाला लाभत असून समाजातील प्रत्येक घटकांसाठी मनापासून काम करण्याची सूर्योदयची परंपरा आहे.
आपल्यासारख्या थोरामोठ्यांच्या आशीर्वादावरच सूर्योदय उद्योग समूह आपली यशस्वी वाटचाल करत असल्याचेही त्यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले.
यावेळी अध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व ज्येष्ठ निरूपणकार सुभाष लऊळकर सर, मेडशिंगीभूषण डॉ मच्छिंद्र सोनलकर, आपुलकी प्रतिष्ठानचे प्रा राजेंद्र यादव इत्यादी मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना सूर्योदयने फक्त आपला उद्योग आणि व्यवसाय एवढीच संकुचित वृत्ती न ठेवता मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जपली असून आपला हा सर्वसमावेशक आणि व्यापक विचारच तुम्हाला उत्तरोत्तर आणखी यशाकडे घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
सूर्योदय फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ भगत यांनीही यावेळी बोलताना बचत व योग्य गुंतवणुकीचे महत्त्व सांगत सूर्योदय ग्रुप बद्दल विशेषतः सूर्योदय फर्निचर मॉल, वस्त्रनिकेतन आणि बझार बद्दल अधिक माहिती सांगितली. यावेळी मंचावर सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे आणि एल के पी मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या या स्नेहसंवाद मेळाव्यात सांगोला शहर आणि तालुक्यातील शिक्षण, शेती, संरक्षण, उद्योग व व्यापार, पत्रकारिता, सामाजिक कार्य, विविध संघटना अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींना मान्यवरांच्या शुभहस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सूर्योदय फाउंडेशनने दिलेल्या या पुरस्कारामुळे आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अधिकचे प्रोत्साहन मिळाले असून आमची जबाबदारी आणखी वाढली असल्याच्या भावना यावेळी सर्वच पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी बोलून दाखवल्या.
पावसाचे वातावरण असतानाही महिलांसह सर्वांची मोठी उपस्थिती, सूर्योदयचे निरपेक्ष कार्य, कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची निवड यामुळे आजचा कार्यक्रम खूपच दर्जेदार झाला असल्याचे यावेळी अनेकांनी बोलून दाखवले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज