टीम मंगळवेढा टाईम्स।
गणेशोत्सव मिरवणुकीत कुठल्याही मंडळाला डीजे वाजवता येणार नसून कोणी नियमाचा भंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करून डीजे जप्त केली जाईल, असा कडक इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी दिला.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलिस पाटील व विविध विभागांचे अधिकारी यांची बैठक मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सपोनि विनोद लातूरकर, नायब तहसीलदार शुभांगी जाधव, पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर, वीज वितरणचे शरद पाटील, पोलिस हवालदार दिगंबर गेजगे आदी उपस्थित होते.
शिवपुजे पुढे म्हणाले, प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने परवानगी घेऊनच गणपती बसवावा, तसेच वीज कनेक्शन हे अधिकृत घ्यावे, अनधिकृत घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, मंडप हे वाहतुकीस अडथळा येऊ नये, अशा पद्धतीने उभे करावेत.
प्रत्येक गणेश मंडळाला एक पोलिस, एक होमगार्ड दत्तक घेत असून, ते सकाळी व संध्याकाळी भेटी देतील, त्यावेळेस काही अडचणी आल्यास त्यांच्याशी शेअर कराव्यात.
डीजेला बंदी असून, पारंपरिक वाद्य कमी आवाजात वाजवून गणेशाचे स्वागत करावे, असे ते म्हणाले.
पोनि दत्तात्रय बोरीगिड्डे म्हणाले, शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेराचा अभाव असल्यामुळे मंडळाने कॅमेरे बसवून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना वाईट घटना पुढे फॉरवर्ड करू नये.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज