mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 11, 2022
in राज्य
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

महाराष्ट्र पाेलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. आजघडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत.

राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी ५ जुलै २०२२ राेजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचे हे ‘वास्तव’ उघड झाले आहे.

पाेलीस दलातील कामकाज सुधारावे, या अनुषंगाने काेपरगाव (जि. अहमदनगर) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्कर काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली हाेती.

काेराेना संकटामुळे या याचिकेवरील सुनावणी दाेन वर्षे लांबली. आता २५ जुलै २०२२ राेजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. एम. एस. कर्णिक यांनी त्यावर सुनावणी करताना

पाेलीस दलातील रिक्त जागांबाबत ९ नाेव्हेंबरला शासनाला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे.

या तारखेपर्यंत किती जागा भरल्या व उर्वरित जागा केव्हा भरणार, याची माहिती शपथपत्राद्वारे मागण्यात आली आहे.

या याचिकेच्या अनुषंगाने गृहविभागाने दाखल केलेल्या शपथपत्रात रिक्त पदांची स्थिती उघड केली. राज्य पाेलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकूण ४३ वेगवेगळ्या पोस्ट आहेत.

त्यासाठी एकूण दोन लाख १९ हजार ७७६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्यात एक लाख लाेकसंख्येमागे १९८ पाेलीस उपलब्ध हाेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १७४ पाेलीस उपलब्ध हाेत आहेत.

वेळेत पदाेन्नती दिली जात नसल्यानेही रिक्त पदे वाढत आहेत. काेराेनापूर्वी पाेलीस दलात पाच टक्के पदे रिक्त हाेती. काेराेनानंतर ही टक्केवारी १३ वर पाेहाेचली आहे.

याचिकेतील मुद्दे?

पाेलिसांची संख्या वाढवा, आठ तास ड्यूटी, रिक्त पदे भरा, वाहने अद्ययावत द्या, यंत्रणा सक्षम करा, तपासासाठी स्वतंत्र पाेलीस यंत्रणा असावी, सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात करावी, पाेलीस ठाण्यात सीसीटीव्ही असावे,

शस्त्रे अद्ययावत असावीत, पाेलिसांकडे इलेक्ट्रिक गन (केवळ शाॅक देऊन बेशुद्ध करणारी बुलेट) असावी, पाेलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध याेजना असाव्यात, आदी मागण्यांकडे या याचिकेतून लक्ष वेधले आहे. (स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस भरती

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; उद्या मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 9, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 8, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा