मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतींसह व्यक्तीगत शौचालये व पिण्याच्या पाण्याची सुविधा या पथकाने तपासली.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने ही तपासणी केली असून अहवाल केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मंत्रालयाकडे सोपवला जाणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील कुटुंबाचे सर्वेक्षण करून शौचालय बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्रामधील स्वच्छता व शौचालयांची तपासणी झाली. सुविधा पथकाने पाहिली. या पथकात उस्मानाबाद जिल्हा कक्षातील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक हनुमंत गादगे,
क्षमता बांधणी सल्लागार शोभा टेकाळे, संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार रियाज शेख, गहिणीनाथ कांबळे, भागवत शिंदे, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार शुभम मगर यांचा समावेश होता. पथकाचे स्वागत सोलापूर जि.प.चे कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सचिन सोनवणे, यशवंती धत्तुरे, वित्त सल्लागार अर्चना कणकी यांनी केले.
समितीने या गावांची केली पाहणी :
उपळाई ठो. (ता. बार्शी), आळजापूर, खडकी (ता.करमाळा) फूट जवळगाव, अकोले खुर्द (ता.माढा), बिजवडी, जांभूड (ता. माळशिरस), वाडीकुरोली, शंकरगाव नळी (ता. पंढरपूर), ब्रह्मपुरी (ता.मंगळवेढा) येथे
स्वच्छ भारत अभियानाची कामगिरी निराशाजनक : स्वामी
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त गाव अभियानाची जिल्ह्यातील कामगिरी निराशाजनक आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सांडपाणी व घन कचऱ्याची कामे पूर्ण करावीत.
संपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी ९० दिवसांचा कालावधी आहे. ५५० गावांमधील सांडपाणी व घनकचरा आराखड्यास तालुकास्तरावर प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली असून सरपंचांनी या गोष्टींमध्ये लक्ष घालावे, अशा सूचना जि.प.चे सीइओ स्वामी यांनी दिल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज