टीम मंगळवेढा टाईम्स।
जानेवारी ते डिसेंबर 2023 या दरम्यान मुदत संपणाऱ्या नवनिर्मित तसेच 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम
काल मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आता ऐन दिवाळीत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज 2359 ग्रामपंचायतींची, तर 3080 ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यपदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
17 जानेवारी 2023 आदेशान्वये राज्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित व 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम देण्यात आला आहे.
या ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना 25 एप्रिलला राज्य निवडणूक आयोगाने आलेल्या हरकती विचारात घेऊन अंतिम केली. या कार्यक्रमानुसार राज्यातील सुमारे 2289 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाल्याचे शासनाने 25 मे, 2023 च्या पत्रान्वये कळविले. 14 जुलैला या ग्रामपंचायतींची मतदार यादी अंतिम झाली होती. आता आज निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
निवडणूक कार्यक्रम कसा असणार ?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 6 ऑक्टोबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, 16 ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 या वेळेत अर्ज दाखल करणे, 23 ऑक्टोबरला दाखल अर्जाची छाननी तर 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे. आवश्यकता भासल्यास निवडणूक 5 नोव्हेंबरला घेण्यात येणार असून, 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
मंगळवेढ्यातील 27 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार
मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायती व एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे यंदा ऐन दिवाळीत मंगळवेढ्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
मंगळवेढा तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आहेत, तर आमदार समाधान आवताडे यांचा गट व ‘बीआरएस’चे भगीरथ भालके यांच्या गटाबरोबरच परिचारक यांचा गट या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे राजकीय धुराळा उडणार आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या निवडणुकीत रंगत वाढणार आहे.
मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीची निवडणूक.
बठाण, मुंढेवाडी, हिवरगाव, महमदाबाद हु, देगाव, उचेठाण, निंबोणी, चिक्कलगी, जुनोनी, ब्रम्हपुरी, भाळवणी, अकोला, शेलेवाडी, डिकसळ, जालीहाळ, लोणार, मानेवाडी, शिरसी, जंगलगी, आंधळगाव, नंदूर, लक्ष्मी दहिवडी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, खुपसंगी, रड्डे, खडकी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज