टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील शिक्षक महासंघाच्या पदाधिकार्यांच्या निवडी यांची घोषणा शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी मंगळवेढा येथील महामंडळ सभेत केली.
यावेळी महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका, महानगरपालिका, नगरपालिकाच्या प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हजारोंच्या संख्येत उपस्थित शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांसमोर संभाजीराव थोरात यांनी शिक्षक संघाच्या वाटचालीची व भविष्यातील धोरणांची माहिती मनोगतातून मांडली.
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या भूमिका स्पष्ट करतानाच सामान्य शिक्षक हा पदाधिकाऱ्यांचा परमेश्वर आहे या भावनेतून कामे करण्याचे आवाहन केले.
उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमासाठी मावळत्या कार्यकारिणीतील सरचिटणीस अंबादास वाजे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब कूल,शिक्षक संघाचे नेते तात्यासाहेब यादव ,लहू कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन वनिता घाडगे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे घोषित पदाधिकारी:
राज्य कार्यकारिणी: राज्याध्यक्ष-अंबादास वाजे- नाशिक, सरचिटणीस आबासाहेब जगताप- अहमदनगर, कार्यकारी अध्यक्ष-मच्छिंद्रनाथ मोरे- सोलापूर, कार्याध्यक्ष-पोपटराव सूर्यवंशी-सांगली, कोषाध्यक्ष-उत्तमराव वायाळ-जालना.
महिला आघाडी राज्याध्यक्ष: अध्यक्षा-स्वाती शिंदे-सांगली.
नगरपालिका, महानगरपालिका पदाधिकारी:
सरचिटणीस-संजय चेळेकर-सोलापूर, कार्यकारी अध्यक्ष-सचिन डिंबळे, कार्याध्यक्ष-शरद पवार.
अखिल भारतीय शिक्षक महासंघ कार्यकारिणी:
अध्यक्ष-एन वाय पाटील- कोल्हापूर, सरचिटणीस-बाळासाहेब झावरे-पुणे.
कार्याध्यक्ष-मोहन भोसले मामा, संघटक -रावसाहेब तुंबे, चिटणीस विलास येळवे.
महिला आघाडी प्रमुख: विद्युल्लता आढाव.
….
सोलापूर जिल्ह्याला झुकते माप:
सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष म.ज. मोरे यांच्यावर राज्य शिक्षक संघाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची धुरा तर राज्य संघाचे विद्यमान उपाध्यक्ष संजय चेळेकर यांना नपा-मनपाचे राज्य सरचिटणीस केल्याने सोलापूर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.
सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील या महामंडळ सभेसाठी सातारा ते मंगळवेढा हा प्रवास राज्यातल्या ,गुरुजनांना पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सायकलवर केला. त्यांच्या या प्रवासाची दखल घेऊन राज्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचा यशोचित सत्कार करणेत आला
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज