टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्यानिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होईल.
त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून तयारीत असलेल्या उमेदवारांकडून आता निवडणुकांसाठी कागदपत्रे जमवाजमवी आणि उमेदवारी मिळवण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची घोषणा करताच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली.
तसेच, उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा किती असेल हेही आयोगाने स्पष्ट केलं आहे.

निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्च मर्यादा देण्यात आली आहे. त्यानुसार, 71 ते 75 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 9 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 6 लाख रुपये खर्च मर्यादा असेल.

तर, 61 ते 70 निवडणूक विभाग असेल्या जिल्हा परिषदांसाठी 7 लाख 50 हजार आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 5 लाख 25 हजार रुपये खर्च मर्यादा असेल. तसेच, 50 ते 60 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 6 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 4 लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा असणार आहे.

जिल्हा परिषद – 6 लाख ते 9 लाख रुपये
पंचायत समिती – 4.5 लाख ते 6 लाख रुपये
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. त्यानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,

सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम तारखेनुसार
जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी- १६ जानेवारी २०२६
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६
नामनिर्देशनपत्रांची छाननी- २२ जानेवारी २०२६
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- २७ जानेवारी २०२६

निवडणूक चिन्ह वाटप- २७ जानेवारी २०२६
अंतिम उमेदवारांची यादी- २७ जानेवारी २०२६
मतदानाचा दिनांक- ५ फेब्रुवारी २०२६
मतदानाचा निकाला-७ फेब्रुवारी २०२६
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












