मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
मुलाच्या अपघाती मृत्यूने खचलेल्या वृद्ध आई-वडिलांनी राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास हातीद ता.सांगोला येथे घडली. वामन महादेव घाडगे (वय ६२) व अनिता वामन घाडगे (५५, दोघेही रा. हातीद), असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत विकास वामन घाडगे यांनी खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
मृत वामन घाडगे यांचा मुलगा आकाश याचा चार वर्षापूर्वी बंगळुरू येथे झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर पती-पत्नी खचले होते.

सोमवारी मुलगा विकास घाडगे हा गावात ग्रामपंचायतीमध्ये कामानिमित्त गेला होता तर पत्नी स्वाती ही चुलते विलास घाडगे यांच्या घरी गेली होती. त्यावेळी आई-वडील शेतात काम करीत होते.

दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास विकास घराकडे परतला असता पत्राच्या स्वयंपाक खोलीचे दोन्ही दरवाजे आतील बाजूने बंद असल्यामुळे त्याने खिडकीतून आत डोकावले.

वडील वामन घाडगे व आई अनिता घाडगे यांनी साडीने लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. सांगोला ग्रामीण रुग्णालयात पती-पत्नीचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















