टीम मंगळवेढा टाईम्स ।
वीस वर्षीय मुलाशी एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी बालविवाह केल्याबाबत अल्पवयीन नवरदेवाच्या आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सज्जन शामराव साळुखे, सुनीता सज्जन साळुखे, पद्माकर पोपट साळुखे, रामचंद्र गणपत साळुखे,बालाजी बाळासाहेब साळुखे,श्रीशैल्य विलास कोरे सर्वजण (रा.जवळा ता.सांगोला), अतुल गोरख चव्हाण (रा.सोनंद ता.सांगोला), नंदा बाळासो काटकर (रा.भोसे ता.मंगळवेढा) यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
हा प्रकार दि.४ डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास नरसिंह मंदिर ,जवळा ता.सांगोला येथे जवळा ता.सांगोला या ठिकाणी असलेल्या नरसिंह मंदिरात अल्पवयीन वधू वरांचा बालविवाह होत असल्याची माहिती सांगोला पोलिसांना मिळाली.
दि.४ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना बालविवाह झाला असल्याचे समजले कोरोनाच्या काळात कुठलाही गाजावाजा न करता विवाह केल्यास कसलीही अडचण येणार नाही,असा विचार करत मुलीच्या आणि मुलाच्या आई – वडिलांनी त्यांचा विवाह लावून दिला.
पोलिसांनी वधू-वरांच्या आईवडिलांकडे चौकशी केली असता नवरदेवाचे वय २० वर्षे आणि वधूचे (वय.१६) वर्षे असल्याचे सांगितले.
दोघांचे वय कायदेशीर विवाह करण्यास पात्र नसल्याचे माहीत असतानाही जाणीवपूर्वक बालविवाह लावून दिला.
याबाबत पो.ना विशाल लेंडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आठ जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९ ,१०,११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.ना दीपक भोसले करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज