मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, लाखभर पगार घेणाऱ्या शिक्षकाने तब्बल चार महिन्यांपासून शाळेत न जाता केवळ सात हजार रुपयांवर खासगी शिक्षिकेला शिकवणीसाठी नेमल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार मेतकुटे यांनी व्हिडीओ चित्रणाद्वारे हा प्रकार उजेडात आणत शाळेतील बोगस कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

राजकुमार मेतकुटे यांनी थेट शाळेत जाऊन संबंधित महिलेशी संवाद साधला असता, आपण गेल्या चार महिन्यांपासून येथे सात हजार रुपये पगारावर काम करत असून, एका शिक्षकाच्या जागी अध्यापन करत असल्याची कबुली तिने दिली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.

यानंतर मेतकुटे यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधून विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता ‘स्वयंसेवक’ असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याच शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त दाखवून विद्यार्थ्यांच्या नावावर मिळणाऱ्या पोषण आहारातही घोटाळा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तत्काळ चौकशी करून निलंबित करा
डमी शिक्षिकेला अध्यापनाची परवानगी देणारे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख हे कोणत्या अधिकारात हा प्रकार खपवून घेत आहेत, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत मेतकुटे यांनी व्यक्त केले.
संबंधित शिक्षक, त्यांना पाठीशी घालणारे मुख्याध्यापक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

तक्रार येताच त्यांना सोमवारपासून बंद केले
शिक्षक संख्या कमी असल्याने दोन ते अडीच महिन्यांपासून शाळेत शिक्षिका शिकविण्यास येत आहे. याबाबत तक्रार येताच त्यांना सोमवारपासून बंद करण्यात आले आहे.- बिरा माने, मुख्याध्यापक, लक्ष्मी दहिवडी झेडपी शाळा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













