टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात काल सायंकाळी वादळासह अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीने प्रमुख चौकातील रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत, तर वादळ व पावसाने छोट्या व्यवसायिकाचे देखील नुकसान झाले.
प्रांत कार्यालय व नगरपालिका या कार्यालयासमोर पावसाचे पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला.
या परीसरात तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, नगरपालिका व उपविभागीय कार्यालय असून या ठिकाणी शहरातील नागरिकांची सतत येत असते. परंतु, शासकीय कार्यालय बंद होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर परत जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागला. वादळी पावसाने जुन्या ऐतिहासिक किल्ल्याच्या बुर्जाचे दगड रस्त्यावर पडले, चोखामेळी चौकात भर रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली.
रतनचंद शहा बँकेसमोर लावलेल्या दुचाकीवर झाड कोसळले. सांगोला नाका येथील एका पान टपरी व्यवसायिकाचे पान टपरी पलटी झाल्याने आतील मालाचे पावसात नुकसान झाले.
शनिवार पेठ, गोविंद बुवा मंदिर, सनगर गल्ली या ठिकाणी झाडे कोसळली. नगरपालिका परीसरात असलेल्या गटारीत पावसाचे पाणी तुंबल्यामुळे गटारीत असलेले दूषित पाणी व घाण देखील या रस्त्यावर आली. साचलेल्या पाण्यातून दुचाकस्वारांना व सायकलस्वारांना आपली वाट शोधावी लागली.
याच परिसरात लहान मुलांसाठी असलेल्या गणेश बागेचा परिसर असल्यामुळे तुंबलेल्या पाण्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.
पावसाळ्याच्या तोंडावर पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचल्याने प्रशासनाने पावसाळ्यातील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी केलेले नियोजन समोर आले.
त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपालिकेने पावसात रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होऊ लागली.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज